पन्हाळा स्वराज्यात सामील – २८ नोव्हेंबर १६५९, अफझल खानाच्या वधानंतर केवळ १८ दिवसांत शिवाजी महाराजांनी पन्हाळासहित वाई ते कोल्हापूरपर्यंतचा मुलुख स्वराज्यात सामील केला. अफझल खानाचा वध करून छत्रपती शिवरायांनी वाई सोडली आणि घोड्यांच्या टापा वळाल्या थेट कराडच्या रोखाने.
अफझल खानाला प्रतापगडावर मारल्यानंतर शिवरायांनी आदिलशाही भागात आक्रमण केले. ११ नोव्हेंबर १६५९ ला ते वाईला पोहोचले व नेताजींना भेटले. नेताजींना त्यांनी अदिलशाही भागात खोलवर जाऊन छापे घालण्यास सांगितले. नाईकजी पांढरे, नाईकजी खराटे, कल्याणजी जाधव व सिद्धी हिलाल हे अदिलशाहीतून फुटलेले सरदार त्यांना मिळाले.
दख्खनच्या पठारावरून दक्षिणेकडे जात त्यांनी वाटेतील आदिलशाही ठाणी जिंकून घेतली. चंदन-वंदन घडाचा वेढा पडला. मग राजे खटाव, मायणी, अष्टी, मासूर, कऱ्हाड, सुपे, पाली, नेरले व अशी इतर गावे जिंकत कोल्हापूरला धडकले आणि आजच्या दिवशी पन्हाळगडासहित कोल्हापूर स्वराज्यात पुन्हा एकदा शिवाजी महाराजांनी सामील करून घेतले.
अशाच अनेक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा – Facebook | Instagram | YouTube वर