शेतकऱ्यांना दिला शंभूराजांनी न्याय, पण…?
युवराज-युवराज्ञीना घेऊन पालख्या संगमेश्वराच्या नावडी काठावर येऊन उतरल्या होत्या. शंभूराजे दूरवर पसरलेल्या चिंचोळ्या खाडीतील पाण्याचा चमचमता पाटा निरखत होते. मावळतीचे तांबूस आभाळ दर्याच्या दर्पणामध्ये उतरले होते. मासेमारी करून आलेल्या कोळ्यांची छोटी गलबते सायंकाळच्या समुद्र लाटांत डुचमळल्यासारखी करीत होती. आखूड काष्टा घातलेल्या, गळाभर मणीमाळा आणि केसांमध्ये रानफुले माळलेल्या कोळणी आनंदाने थिरकत होत्या. डोईवर तांबड्या आखूड टोप्या घातलेल्या, रुमाल बांधलेले, गुढग्यापर्यंत लुंग्या दुमडलेल्या, कोळी होड्यांचा लाकडी फळीवर ठेका धरून नाचत होते.
“वल्व्हव रे नाखवा वल्हव मुरारी
होरी बघा आमची थिरकली दर्याकिनारी
संभुबाळाला ठेवून शृंगारपुरी
का गेलं राजं देशांतरी
बोल रे बोल माझ्या देवा मल्हारी”
ती गाणी कानावर पडताच शंभूराजांनी हसून येसूबाई आणि कविकलशांकडे पहिले.संगमेश्वर गावाने जणू संभाजीराजांच्या मनावर भुरळ घातली होती.वरून आणि अलकनंदा नदीच्या संगमावर असलेले हे पुरातन नगर युवराजांना खूप आवडले होते.तिथेच शंभूराजांनी कर्णेश्वराच्या गाभाऱ्यात जाऊन सप्तनिक दर्शन घेतले.
रात्रीच्या भोजनासाठी शृंगारपूरच्या वाड्यातच परतायचे होते.त्यामुळे पालख्या सोडून शंभूराजे आणि येसूबाई धिप्पाड पाठीच्या दोन मोठ्या अरबी घोड्यांवर बसून शृंगारपूरचे दिशेने टाच मारली. शंभूराजे कसबा ओलांडताहेत तोच अचानक दोनशे तीनशे गरीब शेतकऱ्यांचा आणि कोळ्यांचा जमाव युवराजच्या पथकाला आडवा गेला, “अहो बाळराजे, अहो धनीमायबाप थांबा थोडं,” अश्या करून किंकाळ्या करत शेतकरी पुढे धावले.त्या कास्तकारांनी एकच गिळला आणि आकांत सुरु केला, “मायबाप सरकार, वाचावा हो वाचवा.” “मायबाप सरकार,आम्ही कसं जगायचं ते सांगा.हे जप्तीचे हुकूमनामे बघा.”
“कोणी धाडलेत हे?” शंभूराजे बोलले
“पार रायगडावरून आलेत बघा.” किडकिड्या अंगाचे दोनतीन शेतकरी एकदम बोलले .
“कविराज,बघा बरं. काहीतरी घोटाळा दिसतोय आहे खास,”शंभूराजे गोंधळून बोलले,”इथली प्रभावळीचे सुभेदारी राजांनी आमच्याकडे दिली असताना आम्हांला डावलून हे हुकूमनामे रायगडावरून येण्याचं कारण काय?”
त्या गलितगात्र शेतकऱ्यांच्या हातातले कागद कविराजांची घेतले व हलक्या सुरत बोलले , “अनेक वर्ष शेतसारा तुंबलाय , म्हणूनच हे जप्तीचे हुकूमनामे पाठवलेले दिसतात.” राहुजी सोमनाथ यांची स्वाक्षरी आहे. अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरूनच पाठवल्याचं त्यात स्पष्ट म्हंटल आहे.
“आम्ही तरी कय करणार धनी? गेली सहा-सात सालं काही पिकलाच नाही बघा. ओढ्याचं पाणी सारखं खलाटीत सुटतं. शेताला बांध राहत नाही अन काई पिकतबी नाही. कितीतरी लोकांनीं वैतागून गळफास लावून घेतले बघा…दया करा! मायबाप, न्याय द्या.”
त्या कष्टाऱ्यांची दुबळी, लीनदीन शरीरे पाहता दुसऱ्या पुराव्यांची गरजच नव्हती.तरीही युवराजांनी संगमेश्वराच्या ठाणेदाराला बाजूला बोलावून घेतले. शेतकऱ्यांच्या हानीची खातरजमा केली आणि त्यांनी कविराजांना लागलाच हुकूम केला, “कलशजी, ह्या सर्वांना माफीनामेचे लेखी हुकूम द्या.” युवराजांना जागेवरच न्याय दिला. ते पाहून कष्टकरी कुणबी तिथेच जल्लोष करीत नाचू लागले. त्यांनी शंभुराजांना बक्कळ आशीर्वाद दिले. युवराजचे पथक पुन्हा शृंगारपुराकडे धावू लागले.
दोन दिवसांनी संगमेश्वराचा ठाणेदार सकाळीच दौड करीत, घामाघूम होऊन तो युवराजच्या भेटीसाठी येऊन दाखल झाला.शंभूराजांनी काही विचारण्याआधी तोच आर्जवी भाषेत बोलला,
“युवराज, साराच घोटाळा उडाला आहे. काल रायगडावरुन पथक येऊन तडक संगमेश्वरात दाखल झालं. त्यांनी गरीब शेतकऱ्यांची भांडीकुंडी जप्त केली. दुभत्या गायीम्हशी सरकारजमा केल्या…”
“जप्ती? आणि ती कशासाठी” चक्रावलेल्या शंभूराजांनी कवी कलशांकडे पहिले. कविराजही नाराजीने खाली पाहत होते. शंभूराजांच्या डोक्यात चटकन प्रकाश पडला. ते दातओठ खात बोलले, “आम्ही गरीब कष्टकरी रयतेला माफीनामे लिहून दिले म्हणूनच त्या बिचाऱ्यांवर सरकारातून संक्रांत आलेली दिसते?”
“अं, होय सरकार.” ठाणेदार घाबरत बोलला, “मी त्यांना खूप समजावून सांगितलं. म्हंटल हा निर्णय स्वतः युवराजने घेतला आहे.आणि खरंच शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बेताची आहे. मात्र त्यांचं मत — ते म्हणाले…म्हणाले…”
“बोला, बोला. काहीही न लपवता स्पष्टपणे सांगून मोकळे व्हा.”
“त्यांचं ,म्हणणं-म्हणजे पथकासंगे आलेला राहुजी सोमनाथांचा कारभारी म्हणत होता—शंभूराजे अजून काही गादीवर बसलेले नाहीत. जेव्हा बसतील तेव्हा करू कि मुजरा…”
“अस्सं?” हे पहा त्यांना म्हणावं, “उद्या होईल त्या परिणामाला आम्ही जबाबदार राहू. पण आम्हांवरच्या रागासाठी रयतेला अडवू नका.”
“ते जायच्या मनःस्थितीत दिसत नाहीत शंभूराजे. खूप खूप भांडलो त्यांच्याशी. पण…
“अडखळता कश्याला? सांगा, सांगा”
“ते कारभारी म्हणत होते, इथे राजांच्या माघारी युवराजांचा हुकूम चालत असता वा चालवायचा असता, तर थोरल्या महाराजांनी कर्नाटकात जाताना शंभूराजांच्या हातामध्ये रायगडाची सूत्रं नसती का दिली? कश्यासाठी त्यांना खड्यासारखं निवडून शृंगारपूरच्या रानात दूर फेकलं असतं?”
ठाणेदार कसाबसा घडला प्रसंग सांगून मोकळा झाला. शंभूराजांची मुद्रा तशीच दुःखी आणि संभ्रमित होती. मात्र येसूबाई आणि कवी कलश यांचे चेहरे साफ उतरलेले होते. युवराजच्या ह्या मानहानीचे ते दोघेही कमालीचे संतापून गेले होते. शंभुराजांना अधिक काहीच बोलवेना. फक्त धिम्या आणि करड्या सुरत ते कवी कलशांना म्हणाले, “कविराज, सोबतीला एक हजार स्वारांचं पथक घ्या आणि आताच्या आत्ता संगमेश्वराकडे स्वतः धाव घ्या. राहुजी सोमनाथांच्या कारभाऱ्यासकट रायगडावरच्या त्या हृदयशून्य पुंडांना गिरफ्तार करून इकडे आणा आणि शृंगारपूरचे बंदीखान्यात टाका!”
राणूबाई अक्कासाहेबांच्या पालख्या काही दिवसांमागे वाईहून शृंगारपुरात येऊन पोचल्या होत्या. त्यांच्याबरोबर गोदू हि अली होती. राजांनी अधिक काही बोलण्यापूर्वीच गोदू सांगू लागली, “राजे, आपण इकडे वसुलीकारकुनांना कैद केलात, तेव्हापासून तिकडं गडावर आपल्या विरोधात भलतीसलती कारस्थानं शिजताहेत. खूप कांगावा चालला आहे कारकुनांचा. अण्णाजीपंतांच्या आशीर्वादाने म्हणे राहुजीपंत आणि मंडळींनी शिवाजीराजांकडे खास खलिता धाडला आहे. सरकारी वसुलाच्या कामी आडकाठी आणल्याबद्दल आणि कारभारात ढवळाढवळ केल्याच्या अपराधाबद्दल म्हणे तुम्हाला जबाबदार धरावं. कैद करावं! जर राजे युवराजांना कैद करायची परवानगी न देतील तर किमान महाराज इथे माघारी येईपर्यंत ‘युवराज’ या पदावरून युवराजांना तात्पुरतं का होईना बडतर्फ करावं.” हे सर्व ऐकताच शंभूराजेंनी भवानीच नाव घेताच डोळे मिटले.
शंभूराजेंचा राग म्हणजे “अंगावर गाजतगर्जत कोसळणारी लाट. ती जितक्या वेगाने येते, तितक्याच गतीने नाहीशी होते.”
रायगडाच्या वसुली कारकुनांना राजांनी चांगले महिनाभर इथल्या बंदीखान्यात गंजत व अर्धउपाशी ठेवणार होते. पण राजांनी त्यांना दोन दिवसातच मुक्त केलं उलट त्यांच्या भोजनाची आणि वाटखर्चाची व्यवस्था केली.
संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वाना समजण्यासाठी हि पोस्ट नक्की शेअर करा.
खालील दिलेल्या कमेंट रकान्यात आपले मत नक्की कळवा.