‘शंभूराजे‘ हा शब्द कलशांची प्रथम आपल्या आयुष्यात ऐकला होता तेव्हा कविराजांनी ऐन विशीमध्ये प्रवेश केला होता. पण त्याच तरुण वयामध्ये त्यांनी ब्रजभाषेचा आणि संस्कृत भाषेचा असा सखोल अभ्यास केला होता कि, जणू काही दोन्ही भाषाभगिनी त्यांच्या घरामध्ये पाणी भरत होत्या. विशीआधीच एक उत्तम ब्रजभाषी कवी म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती. मथुरा हे त्यांचे आजोळ. आपल्या संस्कारक्षम वयात त्यांनी बनारस, प्रयाग, मथुरा येथील अनेक जेष्ठांच्या संमेलनांना हजेरी लावली होती. अनेक प्राचीन आणि समकालीन कवींच्या कविता, तसेच लोकगीते त्यांच्या जिभेवर होती. आणि बघता बघता ब्रजभाषेतील एक उत्तम कवी, नुसता कवी न्हवे तर कवींच्या मैफलीतील एक कळस — कलश, म्हणूनच ‘कवी कलश’ असे त्यांचे नाव पडले. प्रयागच्या मुरलीधरशास्त्र्यांचा मुलगा म्हणजेच उमाजी पंडित म्हणजेच कलश.
कवी कलश हे शंभू राजांचे दोस्त, गुरु, दिवाण आणि दिवाने सारे काही होते. संभाजीराजांच्या दिलामध्ये आणि दरबारामध्ये त्यांना एक आगळे स्थान होते.
कवी कलश व शंभूराजांची प्रथम भेट
या दोघांची प्रथम भेट तेव्हा झाली जेव्हा शंभूराजे आपल्या पित्याबरोबर आग्र्याला गेले होते. आग्र्यात जेव्हा कवी कलश शिवरायांच्या सेवेत दाखल झाले. तेव्हा देवपूजेच्या वेळी कलशांच्या मुखीचे शुद्ध संस्कृत पठण राजांनी ऐकले आणि त्यांनी त्यांची नेमणूक शंभूराजांसाठी केली. ते शंभूराजांपेक्षा किमान १० वर्षांनी वडील होते. शृंगारपूरच्या उमाजी पंडिताने शंभुराजांना संस्कृत भाषेची गोडी लावली होतीच. मात्र कवीराजांच्या सुमधुर आवाजातील संस्कृत आणि ब्रजभाषी काव्यपंक्ती ऐकताना युवराज्यांचे तण मन हरपून जाई. आग्राच्या वास्तव्यातच त्यादोघांची अशी गट्टी जमली कि, कविराज काही कामानिमित्त थोडेशे जरी बाजूला झाले तरी शंभूराजे हिरमुसल्यासारखे दिसायचे.
पुढे कवीराज आणि शंभूराजे यांचा स्नेह उत्तोरत्तर वाढतच राहिला. युवराजांनी त्यांच्याकडून ब्रजभाषेतील अनेक छंदगीते समजून घेतली होती. कालिदास आणि भवभूती अशा नाटककारांच्या कलाकृतीचाही दोघांनी मिळून अभ्यास केला होता. कृष्ण, राधा, मीरा असे अवघे गोकुळ कविराजांच्या जिभेवर असायचे. त्यांच्या सहवासातच युवराजांना वाडःमयाची गोडी लागली. तसेच त्यांच्या सहवासात युवराजांनी ‘नायिकाभेद’, ‘नखशिख’ आणि ‘सातसतक’ हे आणखीन तीन ग्रंथ लिहून काढले. ब्रजभाषेतील, नायिकाभेद या ग्रंथ राजांत त्यांनी उच्चतम शृंगाराजे वर्णन केले. तसेच अनेक नायिकांचा वेध घेतला.
संभाजी राजांनी आपल्या ९ वर्ष्याच्या कालावधीत अनेक लढाया करुन मुघलांना सळो की पळो करून सोडले. या काळात कविराज शंभूराजांच्या मागे सावलीप्रमाणे उभे राहिले. बंधू, सखा आणि एक निष्ठावंत सेवक अशा तीन भूमिका त्यांनी पार पाडल्या.
संगमेश्वरला दगा फटका करून खानाच्या शिपायांनी अचानक छापा मारून शंभूराजेंना व कवी कलशांना अटक केली. यांसमवेत सैन्यांनाही अटक करण्यात आली व त्यांची सामूहिक कत्तल करण्यात आली.
या दोघांची मैत्री एवढी जुळली की ती मैत्री इतिहासात कोरली गेली. दोघेही औरंगजेबाच्या कैदेत असताना एवढे भयंकर हाल सोसून देखील दोघांनीही मृत्यूला कवटाळणे पसंद केले, पण त्या औरंगजेबासमोर गुडघे टेकले नाहीत.

मैत्री काय वर्णावी शब्दही अपुरे पडावे…?
यमाला ही प्रश्न पडावा कोणाला आधी सोबत न्यावे…?
“दोघे सोबतच गेले”
दोघांच्या मैत्रीला त्रिवार मानाचा मुजरा…
संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वाना समजण्यासाठी हि पोस्ट नक्की शेअर करा.
खालील दिलेल्या कमेंट रकान्यात आपले मत नक्की कळवा.
2 Replies to “संभाजी महाराज आणि कवी कलश – मैत्री असावी तर या दोघांसारखी”