कर्नाटक मोहीम: राज्याभिषेकानंतर प्रथमच शिवाजी राजे बाहेर पडणार होते. आपल्या कर्नाटकाच्या मोहिमे ची त्यांनी जोरदार तयारी चालवली होती. ४० हजाराचे पायदळ आणि २० हजाराचे घोडदळ घेऊन शिवाजी राजे आणि शंभूराजे मोहिमेवर निघायचे होते.
शंभूराजे जाणते कर्ते झाले होते. थोरल्या राजांकडून पडेल ती जबाबदारी आणि जोखीम ते पार पडत होते. त्यांच्याकडून जाणत्या झालेल्या पुत्राचे सुख म्हणजे काई याची प्रचिती शिवरायांना येत होती. अनेक दरकरांना ,सरदारांना ते परस्पर सांगत, “एवढ्याश्या कामगिरीसाठी आमच्याकडे कश्याला धावता? युवराजांना भेटा. ते सक्षम आहेत.” शंभुराजांना तयारीमध्ये काही कमीअधिक पडू नये म्हणून थोरल्या महाराजांनी बालाजी चिटणिसांना मुद्दाम सूचना दिल्या होत्या. बाळाजी पंत युवराजांच्या प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने लक्ष पुरवीत होते.

संभाजी राजे
संभाजी राजे स्वभावाने सडेतोड. तारुण्याने त्यांच्या अंगामध्ये आलेली थोडीशी बेफिकीरी या गोष्टी रास्त होत्या. परंतु शंभू राजांच्या उग्रपणाची झळ प्रत्यक्ष सरकारकुनांना बसू लागली, तसे अण्णाजी कमालीचे सावध झाले होते इंग्रज, डज, पोर्तुगीज रायगडावर राजांना जेव्हा भेटायला येत तेव्हा ते राजांच्या बरोबर अण्णाजी, मोरोपंत आणि राहुजी सोमनाथ या तिघांना ते न चुकता ते नजराणे आणत. त्यामध्ये द्रव्य थोडे कमी पडले तरी अण्णाजींना त्याचा खूप राग येई. काही वेळा अशा वसुलीसाठी गुपचूप आपले शागिर्दही फिरंग्यांच्या वखरीपर्यंत पाठवत. दक्षिण कोकणातून येणाऱ्या वसुल्यात अनेक वेळा तूट दाखवली जाई.
सत्तासुद्धा जेव्हा लोणच्यासारखी मुरते, तेव्हा अधिकाऱ्यांच्याही तोंडाला पाणी सुटते. असे प्रकार आपल्या राज्यात घडतायत याची थोरल्या राजांना कल्पना होती. पण सरकारकूनांचे वय, त्यांचा अनुभव, पूर्वचरित्र याचा विचार करून राजे तिकडे दुर्लक्ष करीत. मात्र शंभूराजांच्या सळसळत्या रक्ताला या गोष्टी सहन होत नव्हत्या, त्यांनी अनेक चोऱ्या पकडल्या होत्या. तारुण्याच्या कैफात अण्णाजींसारख्याच्या वयाचा विचार न करता ते अनेकदा उघडपणे बोलून जात, “हे आले फुकटराव !” “हे आले द्रव्यचोर!!” युवराजच्या या धाडसी उदगारानी अनाजींसारखी मुरब्बी मंडळी आतून दुखावली जात होती. संभाजीराज्यांच्या अश्या सडेतोड स्वभावामुळे आणि हंसाच्या प्रकरणामुळे अण्णाजींना युवराज जन्मोजन्मीच्या वेरीहून दुष्ट लागले.
सवयीप्रमाणे हजारोच्या गर्दीत शंभूराजे उठून दिसणार, लढाईत तलवारबाजी करणार, वाटाघाटींमध्ये हिऱ्यासारखे चमकणार. पुढच्या कल्पनेने अण्णाजींनी जणू धीरच सोडला,आणि त्याची पावले सोयराबाईंच्या महालाकडे गेली . त्यांनी सोयराबाईंना हाताशी धरून शंभूराजांच्या विरोधात कटकारस्थान करायला सुरवात केली. शंभूराजांनी कर्नाटक मोहिमेवर जाऊ नये यासाठी ते सोयराबाईंचे कान भरू लागले. ह्यामोहिमेच्या निमित्त्यानं थोरल्या महराजांच्या नजरेत शंभूराजे महापराक्रमी होती.आणि ह्या विचाराने सोयराबाईंच्या कपाळावर घाम फुटला आणि त्यांनी आपल्या पदराच्या टोकाने तो टिपला.
शंभूराजे कर्नाटक मोहिम वर जाणार?
“जर शंभू राजे कर्नाटक मोहिमेवर जातील तर मोहिमेत तलवार गाजवतील आणि महाराजांच्या नाकातले बाल ठरतील !” तसे सोयराबाईंच्या अंगातले अवसान गळल्यासारखे झाले त्या पाषाणासारख्या तश्याच निमूट बसून राहिल्या.अण्णाजी पंतांनी सोयराबाईंना स्वराज्याच्या वाटण्या करण्याचा विचार आठवण करून दिला.आणि म्हणाले “आपण फक्त बटवाऱ्याचा आग्रह धरा .मग शिवाजीराजांनाच ठरवू दे त्यांना तूर्तास काय हवंय?” राज्याचा बटवारा कि युवराजांना न्यायचं मोहिमेवर ?
राज्याभिषेकासाठी आलेले काशीक्षेत्रीचे गागाभट्ट शंभाजी’राजांबद्दल ते शिवाजी राजांना असे म्हणले होते कि “हा सवाई शिवाजी होईल “तेव्हा शंभू राजांची कर्नाटक मोहिमेची दोर वेळीच रोखून धरा नाहीतर तिकडून येताना हुशार शंभू राजे आपल्यासाठी वसियतनामा आणतील आणि रायगडावरच्या गवताने साकारलेल्या एखाद्या झोपडीच्या वळचणीलाही जागा उरणार नाही तुमच्या राजारामांना!”
पंतांच्या या सर्व गोष्टी ऐकताच सोयराबाई राणीसाहेब झपाट्याने थोरल्या महाराजांच्या महालाकडे निघाल्या. कसल्याशा अनामिक भीतीने अलीकडे त्यांना घेरले होते याआधी शंभूराजे द्रुष्टीस पडले कि, सोयराबाईंच्या चेहऱ्यावर आनंदाचे नुसते ताटवे फुलून येत. जिजाऊसाहेब सोडल्या तर शंभुराजांवर सोयराबाईं एवढी माया कोणीही केली नव्हती, मात्र त्यांचे चिरंजीव ६-७ वर्षाचे झाले त्यांची बाळपावलं रायगडावर नाचू लागली, अन तिकडे शंभूराजांच्या गौर चेहऱ्यावरच्या दाढीमिश्या राठ होऊ लागल्या होत्या, तसा सोयराबाईंच्या काळजाचा ठोका चुकू लागला.
बिछायतीवर विश्रांती घेणाऱ्या शिवाजी राजांच्या शेजारी सोयराबाई येऊन बसल्या. भविष्याच्या चिंतेने सोयराबाई जाग्या झाल्या होत्या. ‘आपले आणि दुसऱ्याचे’ असा फरक करायला त्यांना काळानेच भाग पडले होते, आपला राजारामबाळ पित्याच्या जागी सिहासनावरच बसलेला दिसावा .त्यांच्या पाठीशी स्वराज्याचे सेनापती आपले बंधू हंबीराव मोहित उभे राहावेत, अशी मधुर स्वप्ने त्यांना पडत होती. शंभूराजांची प्रतिष्ठा आणि प्रतिमा दिसामासाने वाढत चालली होती. गागाभट्टाच नव्हे तर रायगडावर येणारे फ्रेंच, पोर्तुगीजांचे वकील शंभूराजांच्या कुशाग्र बुद्धीची तारीफ करत. त्यामुळेच कि काय शंभूराजे दिसले कि सोयराबाईंच्या गोऱ्यापान कपाळावरची बारीक शीर फुगायची.
शंभूराजे म्हणजे धगधगती आग
सोयराबाईंनी थोरल्या महाराजांना म्हणतात शंभूराजे म्हणजे धगधगती आग ,आपल्या मागे त्यांना कोण आवरणार ? सोयराबाईंच्या ह्या प्रश्नाने शिवरायांनी समजले होते सोयराबाईसाहेबांना काय म्हणायचे आहे .महाराज राणीसाहेबांना म्हणाले कि, “तुमची अशी इच्छा आहे कि शंभू राजांनी आमच्या सोबत कर्नाटक मोहिमेवर जाऊ नये” महाराजांच्या ह्या बोलण्याने त्या थोड्या चपापल्या. “शंभूराजांचा एकूण वर्तन हाताबाहेर गेलंय. त्यांना आपल्या मागे इथे रायगडावर ठेवणे योग्य नाही,” बोलता बोलता सोयराबाई स्वराज्याचे दोन भाग करण्याची गोष्ट बोलून गेल्या तेवढ्यात थोरले महाराज चिडले आणि म्हणाले, “आपण इथेच थांबावं राणीराहेब”.
“हा महाराष्ट्र काही सदाचाराने, सदसद् विवेकाने बांधला गेला आहे, शंभू किंवा राजाराम काय, जे कर्तृत्वान होतील,रयतेचे आणि लष्कराचे लाडके ठरतील, तेच आपल्या अंगमेहनतीनुसार वारसदार ठरतील !”
सोयराबाईंच्या मनाचा बांध फुटला त्या अमान्य स्रीसारख्या रडू लागल्या, शेवटी त्यांनी निक्षून सांगितले, “महाराज एकतर राजाराम साठी राज्य तोडून द्यावे किंवा एकट्या शंभुराजांना मोहिमेवर नेऊ नये .यांपैकी कोणताच निर्णय न मिळेल तर आम्ही अन्नपाणी सोडू? देवाचे लाडके होऊ .”
आपल्या स्वराज्याचे दोन भाग होऊ नये म्हणून शेवटी शिवरायांनी शंभुराजांना कर्नाटक मोहिमेवर घेऊन जायचे नाही असे ठरवले..