रामशेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरला १४ कि.मी. अंतरावर आहे. नाशिकजवळच्या दिंडोरी पासून हा १० मैलाच्या अंतरावर आहे.
“रामशेज किल्ला किल्ला तेवढाच त्याचा इतिहास महान “
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत रामशेज हा असा एकमेव किल्ला होता ज्याने मोगलांशी जवळजवळ ५।। (साडे पाच) वर्षे सतत झुंज दिली. या मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद करुन ठेवण्यासारख्या पराक्रमाचे वर्णन मात्र आपल्याला मोगलांच्या कागदपत्रातून मिळते.
प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब हिंदवी स्वराज्य बुडविण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात आला. अशावेळी नाशिक जवळील छोटासा गड घेण्यासाठी औरंगजेबने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले.
मोगलांनी गडाला वेढा घातला तेव्हा गडावर किल्लेदार सूर्याजी जैधे व ६०० च्या आसपास मावळे होते. मोगलांनी रामशेजवर पहिला हल्ला चढवला आणि मोगल गडाला भिडले, त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर शहाबुद्दीनने वेढा कडक करणे, सुरुंग लावणे, मोर्चे बांधणे, दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढवून हल्ला करणे असे अनेक उपाय केले, पण रामशेजच्या अनुभवी किल्लेदाराने कौशल्याने आणि सावधगिरीने मोगलांचे सर्व मनसुबे उधळून लावले.
गडावरील परिस्थिती अगदी नाजूक होती, गडावरील अन्नाची रसद संपत अली होती, आपल्या किल्ला मोघलांच्या हाती जाऊ नाही द्यायचा यासाठी मावळे उपाशी पोटी लढत होते पण त्यांनी माघार घेतली नाही गडावर अन्नधान्य पाठवण्यासाठी शंभाजी राजांचे प्रयत्न चालू होते हे शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग कळताच त्याने एक बैलगाडी भरून अन्नधान्य पाठवले,पण किल्लेदार सूर्याजी जैधे यांनी ते हुसकावून लावले

मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि किल्ल्याच्या उंचीचा ५० तोफा आणि ५०० सैनिक बसतील एवढा मोठा लाकडी बुरूज बनवला. (याला लाकडी दमदामा असेही म्हणतात).
या लाकडी बुरुजांवरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. याला प्रति उत्तर देण्यासाठी सूर्याजी जैधे याच्या कडे लोखंडी तोफा नव्हत्या,पण ते गप्प बसले नाही त्यांनी आपली शक्कल लढवत लाकडी तोफा तयार केल्या आणि त्याला चामडे जोडून दगडांच्या सहाय्याने शत्रूवर जोरदार हल्ला केला.मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे हटायला तयार नव्हते. शहाबुद्दीनच्या हाती यश येत नव्हते.
त्याचवेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी शत्रूचा वेढा फोडण्यासाठी रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांना पाठवले.त्यांनी वारंवार हल्ला करून खानाच्या फोजेला अगदी बेजार करून सोडले होते, दोन्ही बाजूकडून शहाबुद्दीन पुरता अडकला होता.जवळपास २ वर्षे शहाबुद्दीन खान वेढा होता. एक साधा किल्ला २ वर्षापासून हाती येत नाही हे पाहीन तो चवताळला होता.
“रामशेजवर मराठा सैन्याची भुते आहेत त्यामुळे आपल्याला विजय मिळत नाही” हि बातमी कोकलताश याला कळली आणि त्यावर विश्वास ठेवत त्याने भुते पळून लावल्यासाठी मांत्रिकाला बोलवले मांत्रिकाने १०० तोळे सोन्याचा नाग बनवून आणायला सांगितले, तो बनवलेला नाग घेऊन तो मांत्रिक किल्ला चढू लागला त्याच्या मागोमाग मोघल सैन्य देखील किल्ला चढू लागले; किल्याच्या मध्यावर आल्यावर गोफणीतून सुटलेल्या एका दगडाने मांत्रिकाचा अचूक वेध घेतला आणि मुघल सैन्य वाट मिळेल तिकडे पळू लागले …..!
अश्याप्रकारे पुढे अजून ३ वर्षे ओरंगजेबाने किल्ला हस्तगत करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले.. अखेर नाइलाजाने ओरंगजेबाने रामशेजच्या वेढा उठवला आणि रामशेज काबील करण्याचा नाद सोडून दिला
१६८२-१६८७ या पाच वर्ष्याच्या काळात रामशेज कित्येक वार झेलून देखील अभिमानाने मान उंचावून उभा आहे. सलग ५ वर्षे किल्ला लढविण्याच्या या अतुलनीय पराक्रमाबद्दल संभाजी महाराजांनी किल्लेदार सूर्याजी जैधे यांना रत्नजडित कडे, चिलखत पोशाख आणि द्रव्य देऊन जंगी सत्कार केला…
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरू नका – sambhaji.in
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ.. हर हर महादेव