Entrepreneur कसे बनावे ? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असेल , नमस्कार मित्रांनो मी विकास रॉयल उद्योजक वर तुमचे स्वागत करत आहे , आज च्या काळात आपल्या देशाला नवीन आणि टॅलेंटेड आंत्रप्रन्योर ची खूप जास्त गरज आहे कारण आपला देश जर पुढे प्रगतीच्या पथावर घेऊन जायचा असेल तर त्यामध्ये आपण सर्वांनी कोणत्या न कोणत्या पद्धतीने योगदान द्यायला हवे आणि तुम्ही जर हा ब्लॉग वाचत आहात म्हणजे तुम्ही उद्याचे आंत्रप्रन्योर आहात हे समजत आहे
तुम्ही नक्कीच भविष्यात एक चांगले बिझनेस मॅन व्हाल कारण आज कल च्या युगात मेहनत घेतल्या शिवाय यशस्वी होत नाही आणि तुम्ही हा ब्लॉग वाचत आहात म्हणजे तुम्ही इंटरेसटेड आहात ही दिसून येते आप या ब्लॉग पोस्ट मध्ये पाहूया की आंत्रप्रन्योर कशा प्रकारे बनतात पण त्या आधी ही जाणून घेऊया की आंत्रप्रन्योर म्हणजे नेमक काय असत आणि त्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतात चला मग सुरुवात करूया
Entrepreneur म्हणजे नेमक काय ?
जेव्हा आपण पहिल्यांदा Entrepreneur हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला समजत नाही की आंत्रप्रन्योर म्हणजे नेमक काय असत जेव्हा लोक म्हणतात की आंत्रप्रन्योर म्हणजे बिझनेस मॅन तेव्हा आपण समजतो की आंत्रप्रन्योर म्हणजे बिझनेस मॅन पण नाही आंत्रप्रन्योर म्हणजे बिझनेस मॅन नाही दोणी सेम आहेत पण थोडा फरक आहे बिझनेस म्हणजे आपण तेच करतो जे मार्केट मध्ये अगोदर च आहे म्हणजे पैसे कमवण्यासाठी बिझनेस करणे म्हणजे बिझनेस मॅन असणे यात काही चुकीचे नाही पैसे तर सर्वनिच कंवले पाहिजे आणि आंत्रप्रन्योर म्हणजे काहीतरी नवीन प्रॉब्लेम शोधून त्यावर सोल्यूशन शोधून त्याचा बिझनेस बनवणे याला आंत्रप्रन्योर म्हणतात तुमच्या लक्षात आले असेल आणि आंत्रप्रन्योर चा दूसरा एक factor आहे त्यामध्ये जो व्यक्ति बिझनेस करतो आणि इतर लोकांसाठी नोकऱ्यांची संधि उपलब्ध करून देतो त्याच्या बिझनेस मुळे लोकांना नोकऱ्या मिळतात त्यांना देखील आपण आंत्रप्रन्योर असे म्हणतो हे तर तुम्हाला समजल असेल आता आपण पुढे पाहूया.

Entrepreneur कस बनायच ?
आपण पहिल की आंत्रप्रन्योर म्हणजे काय ? आणि तुम्हाला समजल ही असेल , तर आपण पाहूया की आंत्रप्रन्योर बनण्या साठी काय गोष्टी कराव्या लगता सर्वात पहिल्यांदा आपली खूप जास्त मेहनत करण्याची तयारी असावी मेहनत कराल तर यश मिळेल आता मेहनत काय करायची ते पाहूया , जे काही काम तुमच्या साठी करणे गरजेचे असते ते करणे कधीच टाळू नका , आज टाळल तर ते उद्या वर जाईल आणि तसंच ते पुढे जाईल आणि कधीच होणार नाही
आणि दुसरी गोष्ट कोणतीही गोष्ट करताना कधीही खूप रेसर्च करून करत चला आणि विचार करून करा आपण पुढे एक एक पॉइंट पाहणार आहोत की कोणत्या गोष्टी एका आंत्रप्रन्योर ने केल्या पाहिजेत हे आपण इतर आंत्रप्रन्योर काय करतात त्यांचा अनुभव यावरून आपण पुढील पॉइंट डिसकस करणार आहोत.
नेहमी नवीन शिकत रहा
आज पर्यन्त आपण जे काही यशस्वी लोग पहिले यशस्वी आंत्रप्रन्योर पहिले त्यांच्या मध्ये ही क्वालिटी असते म्हणजे असतेच तुम्ही खूप लोक नोटिस केले असतील त्यातील काही उदाहरण एलोण मस्क , वारेन बफेट , बिल गेट्स , इत्यादि लोंग जे नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात आणि हो फक्त शिकणे च नाही पुढे ही काही गोष्टी असतात त्या म्हणजे जे आपण शिकतो आहे ते आपल्या रोजच्या कामात अॅड करणे implement करणे ही सुद्धा खूप महत्वाचे आहे. नवीन शिकण्यासाठी तुम्ही एखादा मेंटर पाहू शकता जो तुमच्या पेक्षा सीनियर आहे जो तुम्हाला काही गोष्टी शिकवू शकतो , किंवा आजकाल गूगल आणि यूट्यूब वर जे नाही ते नॉलेज एवलेबल आहे आपण तिथून सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकू शकतो माझ उदाहरण द्यायच झाल तर मी कोडिंग सुद्धा फ्री मध्ये गूगल आणि यूट्यूब वरुण शिकत आहे आणि जवळ जवळ 65% शिकून सुद्धा झाली आहे तर तुम्ही सुद्धा काहीही शिकू शकता फक्त शिकण्याची जिद्द पाहिजे , ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नेहमी काहीतरी नवीन शिकत रहा.
पुस्तके वाचण्याची सवय लावून घ्या
आता हेही काही नवीन नाही असा कोणता आंत्रप्रन्योर आहे आणि असा कोणता बिझनेस मॅन आहे जो पुस्तके वाचत नाही ते मला सांगा प्रतेक व्यक्ति जो यशस्वी आहे आणि प्रतेक व्यक्ति ज्याला यशस्वी व्हायचे आहे तो व्यक्ति पुस्तके वाचतो आणि वाचेलाही पाहिजे मित्रांनो वारेन बफेत , बिल गेट्स , एलोण मस्क , मार्क झुकरबर्ग जेफ बेजोस यातील कोणतेही उदाहरण घ्या तुम्हाला नक्की डिसील की ही लोक पुस्तक वाचतात निस्ते वाचत नाहीत तर त्यांना वेद लागले आहे पुस्तके वाचण्याचे आणि 99.99% हे सुद्धा कारण असू शकत की ही लोक इतके जास्त यशस्वी झाले आहेत , मी तुम्हाला कारण सांगतो की जेव्हा तुम्ही पुस्तके वाचत असता तेव्हा तुम्ही त्या पुस्तक लिहिणाऱ्या लोकांचा अनुभव वाचत असता आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही अडछानी येतात तेव्हा जय लोकांच्या आयुष्यात त्या अडचणी अगोदर आलेल्या असतील त्यांचा अनुभव तुम्हाला नक्की कामी येऊ शकतो त्यामुळे कमीत कमी आठवड्याला 1 तरी पुस्तक वाचा.
लीडर शिप क्वालिटी वर फोकस करा
जेव्हा तुम्हाला आंत्रप्रन्योर व्हायचे असते तेव्हा पुढे भविष्यात तुमच्या सोबत खूप लोक काम करणार असतील जेव्हा तुम्हाला खूप लोकांना मॅनेज करावे लागेल आणि तुमच्या कडे लीडरशिप स्किल्स नसेल तर तुम्ही तुमचा वाढवू शकणार नाही वरच्या लेवल ल घेऊन जाऊ शकणार नाही म्हणून लीडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये असायला हवी , कोणत्या क्वालिटी असायला हव्या ते आपन पाहूया , लोकांना रंग न येता त्यांच्या चुका कशा दाखवून द्यायच्या ही समजायला हवे , कामगारांकडून त्यांच्या मार्जिणे काम करून घेता आले पाहिजे लोकांना आपल्या सोबत काम करून आनंद झाला पाहिजे मज्जा मस्ती आणि काम ही झाले पाहिजे अशा पद्धतीने तुमच्या कामगारासोबत बॉस बनून नाही तर त्यांच्यातलाच एक व्यक्ति बनून राहत यायला हवे तेव्हा आपण आपली कंपनी किंवा आपला बिझनेस चांगल्या पद्धतीने कररू शकतो आणि ग्रो करू शकतो म्हणून तुमच्या लीडरशिप स्किल्स वाढवण्यावर आता पासूनच फोकस करा आंत्रप्रन्योर होण्यासाठी जास्तच काही स्पेशल असाव लागत नाही फक्त याच गोष्टी mater करत असतात.
इथपर्यंत आला आहात तर तुम्हाला सल्युट
आजच्या काळात मोठ तर सर्वानाच व्हायच आहे पण कोणी मेहनत करायला तयार नाही पण तुम्ही हा ब्लॉग वाचताय आणि शेवट पर्यन्त वाचताय यावरून समजत की तुम्ही तुमच्या ध्येया विषयी खूप जास्त सीरियस आहात आणि तुमची वाचनाची आवड सुद्धा या गोष्टी वरुण दिसते.
अशाच अनेक माहितीसाठी sambhaji.in या Facebook पेजला लाइक करा.