शिवजयंती २०२३ | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

शिवजयंती २०२३

शिवजयंती २०२३ – मित्रानो आपल्या महाराष्ट्रातील महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते. शिवाजी महाराजांनी अतिशय कमी वयात आपली जवाबदारी समजून स्वराज्यासाठी कार्य केले.

मित्रानो साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला. ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होत करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला.

त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रु लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांच्या कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, जगमता पेटता अंगार. आणि अखेर ती वेळ आली. सहियाद्रीची गर्जना झाली. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी वर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला. ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला…. ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला….

गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्य बद्दल आस्था निर्माण केली. या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, मुरारबाजी, येसाजी कंक यासारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राण्यांचीही बलिदान देतांना मागेपुढे पाहिले नाही.

शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायां नंतरही अनेक राजे उदयास आले. पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज. याचे कारण आहे त्यांचे स्वराज्य बद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यासोबत स्वराज्यासाठी दिवस-रात्र झटायचे.

शिवजयंती २०२३
जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता.
जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता.
स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा
फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता!! 

शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते. काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत, कितीही संकटे आले तर डगमगून न जाता त्यावर शिताफीने मात करत. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूंशी लढा देत एका वीर पुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले.

हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता.
हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता.
अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता
असा जिजाऊचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता. 

अशा या थोर महापुरुषाचा जय जयकार तर झालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की…. जय जय

शिवजयंती २०२३, १९ फेब्रुवारी

You Might Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *