आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहेच ,अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले. मोगल पातशहाच्या राजधानीतून, त्याच्या कैदेतून आजवर कोणी सहीसलामत निसटू शकले नव्हते. प्रत्यक्ष औरंगजेबाच्या बापाचे शाहजहानलाही ते जमले नव्हते. पण शिवाजी महाराजांनी ते करून दाखविले.
आणि असे केले, की पुढे आयुष्यभर औरंगजेब बादशहा त्या एका घटनेबद्दल स्वतःला कोसत राहिला. पश्चात्ताप करीत राहिला. ती तारीख होती – १७ ऑगस्ट १६६६.
तो दिवस होता १२ जून १६६५ रोजी. त्या दिवशी मोगल सेनापती मिर्झा राजे जयसिंग आणि महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. पुढे मिर्झा राजांनी महाराजांना आग्र्यास पाठविले. ते गोळकोंड्याच्या कुतुबशहाला जाऊन मिळतील असे भय मिर्झा राजांना वाटत होते. महाराजांची औरंगजेबाच्या दरबारात जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. परंतु मिर्झा राजांनी आग्रह धरला. म्हणून त्यांना जावे लागले.
जयपूरच्या दफ्तरखान्यातील राजस्थानी हिंदीच्या डिंगल या बोलीभाषेत लिहिलेल्या पत्रसंग्रहानुसार, राजे ११ मे १६६६ रोजी आग्र्याजवळील मलूकचंद सराई येथे पोचले. १२ मे रोजी ते आग्र्यात आले. त्याच दिवशी त्यांची आणि औरंगजेबाची पहिली आणि अखेरची भेट झाली.
पत्रानुसार, बादशहा हा दिवाण-ए- आममधून उठून गुसलखान्यात (दिवाण-ए-खास) जाऊन बसला होता. शिवाजी गुसलखान्यात आला. बादशहाने बख्शी असदखान याला आज्ञा केली, की शिवाजीला घेऊन या आणि मुलाजमत (भेट) करवा. असदखानाने शिवाजीला बादशहापाशी आणले. शिवाजीने बादशहा नजर म्हणून एक हजार मोहरा आणि दोन हजार रुपये नजर केले. यानंतर महाराजांना ताहिरखानाच्या जागेवर राजा रायसिंग याच्यापुढे उभे करण्यात आले. त्यादिवशी त्यांना दरबारात इतरांन सारखी वागणूंक दिली गेली, महाराजांना बादशहा ला वाकून मुजरा करा असे सांगण्यात आले थोडक्यात आपल्या महाराजांना बादशहाने दरबारात अपमानित केले .
यानंतर महाराजांना कैद करण्यात आले. महाराजांना त्यांच्या तळावरच कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले. त्यानंतर बादशहाने महाराजांना निरोप पाठविला, की तुम्ही आपल्याजवळील किल्ले मला देऊन टाका. मी तुमची मन्सब बहाल करतो.
महाराजांनी त्याला नकार दिला. नंतर हळूहळू महाराजांनी आपल्या सोबत आणलेल्या लोकांना स्वराज्यात पाठविण्यास सुरूवात केली. १४ ऑगस्टला औरंगजेबाने महाराजांच्या भोवती चौकी-पहारे कडक केले. त्याना विठ्ठलदासांच्या हवेलीत नेऊन ठेवण्याचा हुकूम केला
ते याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी रामसिंगच्या तळावर गेले, तर रामसिंगने त्यांना भेट नाकारली. थोडा वेळ वाट पाहून महाराज परत गेले.
तब सेवौ जाणौ अब बुरा हौ, तब भाग्यो.
तेव्हाच त्यांनी ओळखले, की आता अनर्थ होणार. त्यांनी आग्र्यातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि १७ ऑगस्टला त्यांनी पिंजरा फोडला.
शिवाजी महाराजांनी आपली आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली?
मुंगीलाही प्रवेश करणे कठीण जावे अशा या चौकी-पहा-यातून महाराज निसटले. पण कसे? देवाचा प्रसाद म्हणून शिवाजी महाराज दर गुरूवारी मिठाईचे मोठमोठे पेटारे बाहेर वाटण्यासाठी म्हणून पाठवू लागले आणी आपण आजारी असल्याचे नाटक केले असे काही दिवस चालले मग एके दिवशी महाराजांनी हिरोजी फर्जंद यांना आपल्या जागी झोपवले, मग मिठाईचे दोन पेटारे रिकामे केले आणि त्यात बसून तो आणि त्याचा मुलगा हे बाहेर पडले. त्यांनी तडक मथुरेची वाट धरली. सेतुमाधवराव सांगतात, की तेथे निष्कर्ष आहे वेशांतराचा.
पेटा-यांची ये-जा होती. ते पाहणा-यांच्या गर्दीत महाराज वेशांतर करून मिसळले आणि निसटले. संभाजीराजांना पेटा-यात बसविले असणे शक्य आहे. पण महाराज स्वतःला अगतिक आणि कुचंबलेल्या अवस्थेत पेटा-यात कोंडून घेतील हे त्यांच्या स्वभावावरून आणि सावधगिरीवरून शक्य वाटत नाही, असे सेतुमाधवराव म्हणतात.
मग ही पेटा-यात बसल्याची कथा कशी आली?
सेतुमाधवराव म्हणातात –
पेटा-यात लपून गेले त्यामुळे आम्हांला दिसले नाहीत, असे सांगून आपली सुटका करून घेण्याची ही मोगल अधिका-यांची युक्ती नसेल कशावरून? खुद्द औरंगजेबाचा या गोष्टीवर मुळीच विश्वास नव्हता.
वेष बदलून खांद्यावर कावड ठेवून महाराज मिठाईच्या पेटा-याबरोबर निघून गेले. महाराज काय तोंडात जादूची गोळी धरून गेले की पक्षी बनून गेले की वारा बनून गेले? काय चमत्कार करून गेले याचा पहारेक-यांना पत्ताही लागला नाही.
त्याचा शंभर टक्के खात्रीलायक पत्ता तसा अजूनही लागलेला नाही.
अर्थात महाराज कसे याहून, सुटले याला मोल आहे.
अशाच अनेक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा – Facebook | Instagram | YouTube वर
महाराजांच्या बुद्धीला तोड नाही…हर हर महादेव
एक थरारक अनुभव…
एक थरारक अनुभव…
महाराजांच्या तल्लख बुद्धीला सलाम…
खरंच महाराज्यांची तल्लख बुद्धीला सलाम…