आज ३ एप्रिल…. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत दु:खद दिवस..
आजच्याच दिवशी ३४३ वर्षापूर्वी म्हणजेच चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, शनिवार, ३ एप्रिल १६८० रोजी हिंदुपदपादशाहीत अतिशय दु:खद घटना घडली.. ती म्हणजे निश्चयाचा महामेरू, हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिंदुपदपादशहा पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पोरके करून निघून गेले.
काळाने स्वराज्यावर अचानक घाव घातला आणि तळपता सूर्य डोक्यावर असताना भर दुपारी १२ वाजता स्वातंत्र्यसूर्य मात्र मावळला.
महाराज…. एक आपण होतात म्हणून आज देश, देव आणि धर्म शिल्लक आहेत. राजे.. आपण होतात म्हणून आज आम्ही हिंदू म्हणून ताठ मानेने वावरतो आहोत. अन्यथा सुंता निश्चित होती.
महाराज.. आज ३४३ वर्षानंतरही आम्हाला, या महाराष्ट्राला नव्हे तर अखंड हिंदुस्तानाला तुमची गरज आहे जितकी तेव्हा होती.
श्री छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांच्याठायी निष्ठा आणि खरी श्रध्द्धांजली ठरेल.
श्री छत्रपती शिवरायांच्या चरणी ३४३ व्या पुण्यतिथिनिमित्त मानाचा मुजरा आणि कोटी कोटी दंडवत.. !!!
अशाच अनेक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा – Facebook | Instagram | YouTube | @sambhajidotin वर
Thanks
swarajyacha kala divas